मंगळवार, १ फेब्रुवारी, २०११

बोडखा लिंब: bodkha limb                                      ...

बोडखा लिंब:
bodkha limb
...
: "bodkha limb ..."

bodkha limb 

                                                  बोडखा  लिंब  
             नगररपासून सुमारे ५ कि.मी. अंतरावर आमचे बुऱ्हानगर  गांव आहे .आमच्या लहानपणी म्हणजे साधारण १९६२-७० चा काळ त्यावेळी आमचे गावात फार तर फार ५० ते ७० उंबरा असेल म्हणजे लोकसंख्या ५०० च्या आतच . असे आमचे छोटेसे गांव .गावामध्ये वीज नव्हती करमणुकीची साधने म्हणजे रेडिओ त्यवेळी कामगार सभा नावाचा रेडिओवरील संध्याकाळचा कार्यक्रम फार लोकप्रिय असायचा , बिनाका गीतमाला हाही कार्यक्रम तरुण मुलाना फार प्रिय असायचा . त्यावेळी गावात फक्त ४थिपर्यन्त्च शाळा होती ५वीला जायचे म्हटले कि नगरला जावे लागायचे .आम्ही नगरला शाळेत जायचो तेव्हा घरून निगताना काही मुले लवकर निघायची त्यांनी एकमेकाला सांगायचे कि " अरे ! बाळू मी ५ मिनिटात येतो तोपर्यंत तु कुठे थांबतोस ?" बाळू म्हणायचा ," नाना ! मी" बोडख्या लीम्बाजवळ " थांबतो ." आणि बहुतेक सर्व नगरला जाणार्यांचा थांबा (STAOP) म्हणजे बोडखा लिंब ठरलेला . हे कडू लिंबाचे झाड होते व त्याचेच नाव बोडखा लिंब होते , गंमत म्हणजे हे झाड खूप मोठे आणि डेरेदार होते जवळ जवळ १०० माणसे त्याच्या सावलीला बसू शकतील एवढी मोठी सावली असायची . मला कायम आश्चर्य वाटायचे कि एवढे मोठे झाड आणि त्याचे नाव मात्र बोडखा लिंब किती विरोधाभास ?
         जिज्ञासा थांबत नव्हती म्हणून एक दिवस आमचे एक चुलते त्यावेळी त्यांचे वय ४०च्या आसपास असावे , त्यांना मी विचारले " तात्या ! आपल्या गावाबाहेरचा रस्त्यावरील जो बोडखा लिंब आहे  तो एव्हढा भव्य आहे आणि त्याचे नाव मात्र बोडखा लिंब हे बरे नाही वाटत , हे असे नाव त्याला का पडले असावे ? " त्यांनी मला सांगायला सुरुवात केली ते म्हणाले ," अशोक ! अरे आम्ही लहान होतो तेव्हाची गोष्ट आहे हा जो बोडखा लिंब आहे ना तो तेव्हा फार मोठा डेरेदार वृक्ष होता . काही दुष्ट लोकांची वक्र दृष्टी त्याचेवर पडली आणि ते झाड त्यांनी तोडले , कोणी काही म्हणाले नाही कारण तेव्हा एव्हडी पर्यावरणाविषयी  एव्हढी जागृती नव्हती . त्यामुळे कोणीही झाड तोडणार्यांना काहीही बोलले नाही .झाड तोडले खरे पण ते सगळे तोडले नव्हते वर वर तोडले होते जमिनीपासून साधारण ३-४ फुट तसेच राहिले होते ." म्हणून या तुटलेल्या झाडाला "बोडखा " म्हणण्याची पद्धत पडली . आणि त्या सुंदर झाडाच्या त्या तुकड्याला "बोडखा लिंब " म्हणू लागले .

              कालांतराने ते तुटलेले झाड पुन्हा हिरवे होऊ लागले आणि हळू हळू त्याला पाने फांद्या फुटू लागल्या व काही वर्ष्यातच तो तुटलेला बोडखा लिंब हिरवागार होऊन परत डेरेदार वृक्ष झाला . पण ! त्याचे नाव मात्र "बोडखा लिंब " असेच राहिले .आणि आत्ताही तो आमचा थांबा बोडखा लिंब " हाच राहिला .आम्हाला जसे कळू लागले तसे आमच्या जन्मागोदर जन्मलेल्या बोडख्या लिंबाखाली किती लोक आले आणि किती गेले याची गणती नाही 
                  या  लिंबाचा बहुविध उपयोग होत होता . मला आठवते या झाडाखाली आम्ही शाळकरी मुले जाताना थांबायचो आणि शाळेतून येताना थकून भागून याच झाडाखाली विसावा घ्यायचो . तेथेच झाद्खाली एक सायकलवाला सायकली दुरुस्त करायचा . त्यावेळी मोटारसायकल क्वचितच दिसायची ..जवळ जवळ नाहीच म्हटले तरी वावगे ठरणार नाही . सायकल पंचार काढून देणे , तिला आईल -पाणी करणे हा त्याचा व्यवसाय त्याच्यावर त्याचे पोट भरायचे .म्हणजे बोडखा लिंब त्या कुटुंबाचा आधार होता . असाच एक टाकली मियाचा ज्योतिषी वेनुनाथ शिंदे  , तो वारकरी होता पण भविष्य सांगायचं व पत्रिका सुद्धा करायचा . त्याचा स्वभाव मोठा गोड , लाघवी सर्वाना त्याचे भविष्य आवडायचे .बऱ्याच वर्षे तो याच बोडख्या लिंबाखाली बसून भविष्य कथन करायचा . त्यालाही लोक दक्षिणा द्याचे त्याचेही पोट याच झाडाखाली भरले. कालांतराने तो जोतीशी मला तिथे दिसेना ,अधिक चोकशी केली तेव्हा  कळले कि तो जोतीशी या जगात आत्ता राहिला नाही .बोडख्या लिंबाने त्यालाही आधार दिला . </span>
<span>               गमत  म्हणजे त्यावेळी दारू पिणे म्हणजे फार मोठे समजत(खोटी प्रतिष्ठा ) असेच काही पेताड खूपच प्यायले कि याच लिंबाखाली येऊन पडत व शुद्धीवर आले म्हणजे पुढचा मार्ग आक्रमित असत .कधी कधी नगरचे प्रेमी युगल याच झाडाखाली कुजबुज करायचे त्यावेळी हे असे प्रकार अप्रूप वाटायचे येणारे जाणारे चोरून त्यांच्याकडे पहायचे आणि आपसात संस्काराविषयी चर्चा करायचे व हल्ली पिढी कसी बरबाद होत चालली याची चिंता करायचे (खरे तर मनातून त्यानाही मजाच वाटायची ) कधी कधी त्यांना हानामारही व्हायची तीही याच लिंबाखाली .
            नवरात्रीचा  उत्सव आमचे गावाला फार मोठा ..त्या नऊ दिवसात हजारो लोक यायचे तेही थकले कि याच झाडाखाली विसावा घ्यायचे .तिथे झाडाखाली पान-फुले विकण्याकरिता एक छोटी मुलगी वासायाची लोकांना दोन पैश्यात पान-फुले विकत द्यायची नऊ दिवसात तिलाही याच झाडाच्या आश्रयाला पैसे मिळायचे . कधी कधी पायी  जाणारे साधू-संत  जाता जाता याच जाडाखाली थांबायचे . घोटभर पाणी पिऊन पुढे चालू लागायचे . रात्रीच्या वेळी तर चोरांचेही आश्रयस्थान म्हणजे हेच झाड होय रात्री याच्या सावलीत कोण बसले आहे ते दिसत नसायचे व अचानक येणाऱ्या  एकट्या दुकट्या माणसावर हल्ला करून त्याला लुटायचे तेही याच झाडाखाली .
            अशा  अनेक घटनांचा साक्षीदार म्हणजे हा बोडखा लिंब .. पण म्हणतात ना "कालाय तस्मै नमः |" काळ जसा पुढे गेला तसे परिस्थिती बदलली कार आल्या , मोटारसायकली आल्या रस्ता गजबजू लागला नगरला जायला पूर्वी अर्धा तास लागायचं ठीथे आत्ता १० मिनिटात पोहचता येते त्यामुळे बोडख्या लिंबाखाली थांबायची कोणाला आवश्यकता वाटत नाही ,भविष्य कॉम्पुटरवर निघते त्यामुळे झाडाखाली बसून भविष्य सांगणारा झाडाखाली बसत नाही .या झाडाची आवशकता आता कोणाला वाटत नाही .
          एक दिवस एक बाई हातात कुर्हाड घेऊन या झाडावर त्याच्या बुंध्यावर घाव घालीत होती , त्याचे असे झाले कि एक बाजूने या झाडाची साल सुकली होती ती साल या बाईने काढली आणि  तिने घरी चुलीवर ती साल जलन म्हणून वापरली आणि स्वयंपाक करून घरातील सर्वाना जेऊ घातले. हळू हळू अनेक श्त्रीयानी झाडाची सर्व बाजूने साल काढली त्याचा परिणाम असा झाला कि ते झाड जवळ जवळ अर्धे वळून गेले , तरीही उरलेल्या अर्ध्या हिरव्या झाडाने  सावली देण्याचे सोडले नाही. काहीही तक्रार न करता सावली देताच राहिले.काही लोकही त्या अर्ध्या सावलीत बसून आराम करीत होते .कालांतराने ते  अर्धे झाडही सुकले. पूर्ण सुकलेले झाड लोकांनी पूर्ण तोडून नेले व स्वयंपाकाला वापरले. शेवट-पर्यत त्याचा उपयोग लोकांनी करून घेतला   " लावणी ज्याने केली | का खांडावया घाव घाली | दोघा एकची दे सावली | वृक्ष जैसा || हे ज्ञानेश्वरांनी सांगितल्या प्रमाणे हा स्थितप्रज्ञ वृक्ष शेवट-पर्यंत सावली देताच राहिला हा त्याचा स्वधर्म त्याने पालन केला , कोणाकडूनही प्रतीउपाकाराची भावना न ठेवता . एका परोपकारी जीवनाची इतिकर्तव्यता संपली . एक परोपकारी संपन्न जीवन संपले ...याची ना कोणाला खंत ना कोणाला पश्चाताप .

-अशोकानंद महाराज कर्डिले