मंगळवार, २७ सप्टेंबर, २०११

|| सर्व मंगल मांगल्ये ||

                   – सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके |


                      शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते.||


शारदीय   नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! दिनांक २८-९-११ रोजी बुधवारी शारदीय नवरात्रीला आरंभ होतो आहे.दरवार्ष्याप्रमाणे सर्व भारतात व भारताबाहेरही ह्या नवरात्रीचा महोत्सव धुमधडाक्यात सुरु होणार आहे . आमचे गावी हे नऊ दिवस म्हणजे फार मोठा सोहळा असतो कारण आमचे गावी आई तुळजा भवानी मातेचे माहेर आहे आणि तुळजापूर हे सासर समजले जाते .पालखीचा फार मोठा मान आमचे गावातील देवीच्या भगत म्हणजेच पुजार्याला मिळतो. प्रत्येक मोठ्या घटनेमागे काही तरी कथा , आख्यायिका असते तशी ती कथा आमचे देवीचे बाबतीत सुद्धा आहे तीच कथा पुढे देत आहे.


मन्त्राणां मात्रुका देवी शब्दानां द्न्यानरुपिणी ।द्न्यानामं चिन्मयातीता शुन्यानां शून्यसाक्षिणी ।यस्या परतरं नस्ति सॆषा दुर्गा प्रकीर्तिता ॥ नमस्कार । जय हरि । बंधु आणि भगिनीनो,     आमचे गांव बु-हाणनगर , ता.’नगर हे गांव एका महत्वाच्या कारणासाठि प्रसिध्द आहे , ते म्हणजे छत्रपति शिवाजी माहाराजांची कुलस्वामिनी आई जगदंबा श्री तुळजा भवानी माता हिचे बु-हाणनगर  हे माहेर आहे तीचि बाल्यावस्था आमचे गांवातील जानकोजी तेली (भगत) हयांचेकडे गेले.  
                    घटना मोठि मह्त्वाची आहे..... जानकोजी तेली (भगत)  यांचेकडे एके दिवसी एक छोटी मुलगी रोगग्रस्त असलेली आली म्हणजे हि त्यांची स्वत:ची मुलगी नव्हती पण ! त्यांनी स्वत:च्या पोट्च्या मुलीपेक्षाहि जास्त प्रेमाने तीचा सांभाळ केला तिचा आजार बरा झाला.दिवसा मागुन दिवस जात होते . काळ कधि कोणासाठि थांबत नाहि. मुलगी अंबिका उपवर झालि. पित्याला काळजी वाटु लागली मुळातच ती सुंदर होति त्यात प्रत्यक्ष आदिशक्तीचा अवतार त्यामूळे तेज ओसंडुन जात होते. बापाला अधिकच चिंता वाटू लागलि . खरे तर असे आहे की बापाला लेकीचे ओझे कधिच वाटत नसते पण ! काळजी मात्र वाटत असते. या न्यायाला धरून जानकोजीला काळजी वाटत होती.  मला या ठीकाणी कण्व मुनिंची, राजा जनकाची आठवण येते , शकुंतला हि कण्व मुनिंची ओरस कन्या नव्हति ती महर्षि विश्वामित्रांची होती. भगवती सीतादेवी हि जनकाला शेतामध्ये प्राप्त झालेली कन्याहोति पण या दोघांचेहि या मानस कन्येवर अतिशय प्रेम होते. त्यांच्या विवाहानंतर त्यांना अश्रू आवरत नव्हते. तीच अवस्था जानकोजीची होती. दुसरे महत्वाचे कारण म्हणजे तत्त्कालिन काळ म्हण्जे मोगलाच्या सत्तेचा होता.जगण्यासाठि सुध्दा जिथे कर द्यावा लागत होता तिथे बाकीचा विचारच नाहि.

              अहमदनगरचे मुळ नांव अंबिकानगर होते परंतु अहमदशाहाची राजवट सुरू झालि आणि अंबिकानगर्चे अहमदनगर झाले. आमचे गांवहि त्याच काळात बु-हाण्शाहाच्या अंमलाखालि होते त्याच्या नांवावरुनच बु-हाणनगर हे नांव पडले आहे.आता आमचे गांवाला "एकनाथनगर " म्हणतात कारण आमचे गावचे श्री एकनाथ कर्डिले ह्यांना बांगलादेश- युध्दामध्ये मरणोत्तर "विरचक्र" पुरस्कार मिळाला आहे.  त्यामूळे या गांवाला "एकनाथनगर " सुध्दा म्हणतात.(अ’नगर पासुन हे गांव ५ कि.मि. आहे)

              मुस्लिम शासकांचे जनानखाने असंख्य स्त्रियांनि भरलेले असायचे. भोग , विलास यातच शासक रमलेले असायचे. आम्च्या जानकोजीला त्यामुळे चिंता वाटत होती. मन चिंती ते वॆरि न चिंती म्हणतात त्याप्रमाणे च घडले बु-हाण्शाहाच्या नजरेला हे कन्यारत्न पड्ले आणि त्याने जानकोजीला  हुकुम सोडला की ," तुझि मुलगी माझे जनानखान्यात पाठवून दे अन्यथा माझ्या सॆन्याकरवि मी तिला बळजबरिने घेउन जाईन." जानकोजीने त्याचा हुकूम मानला नाही त्याने ठरविले प्राण गेला तरि चालेल पण मी माझ्या अंबिकेला दुष्टाच्या तावडीत सापडु देणार नाहि . जानकोजीला चिंताक्रांत पाहुन अंबिकेने विचारले ," बाबा तुम्हाला कसली चिंता आहे ते मला कळते आहे. तुम्ही काळजी करु नका  मी सर्वसामान्य मुलगी नाही , मी तर अनादि अनंत कधीहि नष्ट न होणारि आहे. मी आदिशक्ति आहे.परित्राणाय साधुनां विनाशाय दुष्क्रुताम । धर्म संस्थापनाय संभवामि युगे युगे ॥ मी धर्माचे रक्षणासाठि व दुष्टांचा नाश करण्यासाठी आले आहे त्यामूळे तुम्ही चिंता करु नका."
               जानकोजीला भगवतीचे खरे स्वरुप कळले होते त्यामुळे त्याची चिंता कमी झाली खरि पण घटना टळत नाहि. विनाश काले विपरित बुध्दी...या न्यायाने  बु-हानशाहाने सॆन्य पाठवून तीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला , पण झाले उलटेच सॆनिकांच्या हाती अंबिका लागली नाहि ती नागरदेवळे-भिंगार- जामखेड मार्गे तुळजापुरला प्रगट झाली. भक्तगणांनी तिचा जयजयकार केला, स्वागत केले. याच तुळजाभवानी मातेने राजा शिवछत्रपती श्री शिवाजी महाराजांना साक्षात्कार देउन अफजलखानाचे पारिपत्य केले होते.
 भगवती अंबिका तर बु-हानशाहाच्या हाती लागली नाहि उलट इकडे भयानक तुफान सुरु झाले मेघगर्जनेसह भयंकर पाउस सुरू झाला आणि मोठा भुकंप झाला त्यात बु-हाणनगर उध्वस्त झाले संपुर्ण नगरी पालथी झाली..हा हा हाकार झाला.त्याची खुण म्हणुन की काय पण आजहि आमचे गांवात उत्खननात जर काहि वस्तु सांपडलि तर ती पालथी सांपडते. 
                   अशा या करुणामय भगवतीचा अंबिका मातेचा नवरात्रिचा मोठा उत्सव  असतो या उत्सवामध्ये आमचे गांवचे व सध्या राहुरी मतदार संघाचेआमदार व माजी राज्यमंत्री श्री शिवाजीराव कर्डिले यांचा फार मोठा सहभाग असतो, त्यांचे कुशल नियोजन असते. 
                     तेव्हा सर्व बंधु - भगीनिना विनंति करतो कि आपण आमचे गांवाला यानिमीत्ताने जरुर या आई जगदंबेचे दर्शन व आमचा पाहुणचार स्विकारावा हि आग्रहाची विनंती करतो 


 **********ता.क. तिस-या माळेला येथे पालखि सोहळा असतो, व यात्रेचा मुख्य दिवस असतो.



                                                                                                        आपला स्नेहाकिंत

                                                                                               अशोकानंद महाराज कर्डिले.


संपर्क:- मो.नं. ९४२२२२०६०३ 

सोमवार, २० जून, २०११

अहं ब्राम्हस्मी हा मंत्र नसून तो विचार आहे

जय हरी !
अहं ब्राम्हस्मी हा मंत्र नसून तो विचार आहे (मननात त्रायते इति मंत्र:- मननात तारतो तो मंत्र )  " देहोहम " म्हणजे मी देह हा जो भाव आहे तो घालविण्यासाठी मी ब्रह्म हा भाव किंवा विचार घ्यायचा नंतर तो पण टाकून द्यायचा आणि " सोहम तेही अस्तावले |" म्हणजे काहीच नाही अहं आणि सोहम दोन्हीही सापेक्ष आहेत पण त्यांचा उपयोग मी देह हा अहंकार घालविण्यासाठी होतो , साधी गोष्ट आहे मी आहे तर तू आहे मीच नाही तर तू कुठून ? ब्रह्म एक आहे हे म्हणणे सुद्धा सापेक्ष आहे कारण एकाच्या सापेक्ष दोन आहे " एरवी सर्वांच्या हृद्य देशी | मी अमुक आहे ऐशी | जे बुद्धी स्फुरे अहर्निशी | ते वस्तू गा मी || ज्ञानेश्वरी . किंवा जगद्गुरू श्री तुकारम महाराज म्हणतात ,' तुका म्हणे अहं ब्रह्म | आड येऊ नेदी भ्रम || " अहं ब्रह्म म्हणजे सुद्धा भ्रमच आहे .  वेदांताचा नियम असा आहे कि " समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो " एक भ्रम घालवण्यासाठी दुसरा भ्रम घ्यावा लागतो नन्तर तोही टाकून द्यावा लागतो .काट्याने काटा काढला कि दुसरा काटा फेकून द्यावा लागतो नाहीतर पहिल्यापेक्षा दुसरा जास्त घातक . लोखंडाची बेडी काय आणि सोन्याची बेडी काय दोन्हीही अडकवाणारच ..तेव्हा   तुका म्हणे अहं ब्रह्म | आड येऊ नेदी भ्रम || हेच खरे पण निरपेक्ष वृत्ती होण्यासाठी अंत:करणाची तेव्हढी तयारी लागते आणि हे " अभ्यासाने साध्य होते " श्री तुकाराम महाराजांचा एक फार छान अभंग आहे - साधुनी बचनाग खाती तोळा तोळा | अनिकाते डोळा न पाहावे ||१|| साधुनी भुजंग धरतील हाती |अनिके कापती देखोनिया ||२|| असाध्य ते साध्य करिता सायास | कारण अभ्यास तुका म्हणे || तेव्हा अहं-सोहमच्या पलीकडे जाण्याचा अभ्यास म्हणजे खरा परमार्थ होय.( practice  makes  man  perefect )

मंगळवार, १ फेब्रुवारी, २०११

बोडखा लिंब: bodkha limb                                      ...

बोडखा लिंब:
bodkha limb
...
: "bodkha limb ..."

bodkha limb 

                                                  बोडखा  लिंब  
             नगररपासून सुमारे ५ कि.मी. अंतरावर आमचे बुऱ्हानगर  गांव आहे .आमच्या लहानपणी म्हणजे साधारण १९६२-७० चा काळ त्यावेळी आमचे गावात फार तर फार ५० ते ७० उंबरा असेल म्हणजे लोकसंख्या ५०० च्या आतच . असे आमचे छोटेसे गांव .गावामध्ये वीज नव्हती करमणुकीची साधने म्हणजे रेडिओ त्यवेळी कामगार सभा नावाचा रेडिओवरील संध्याकाळचा कार्यक्रम फार लोकप्रिय असायचा , बिनाका गीतमाला हाही कार्यक्रम तरुण मुलाना फार प्रिय असायचा . त्यावेळी गावात फक्त ४थिपर्यन्त्च शाळा होती ५वीला जायचे म्हटले कि नगरला जावे लागायचे .आम्ही नगरला शाळेत जायचो तेव्हा घरून निगताना काही मुले लवकर निघायची त्यांनी एकमेकाला सांगायचे कि " अरे ! बाळू मी ५ मिनिटात येतो तोपर्यंत तु कुठे थांबतोस ?" बाळू म्हणायचा ," नाना ! मी" बोडख्या लीम्बाजवळ " थांबतो ." आणि बहुतेक सर्व नगरला जाणार्यांचा थांबा (STAOP) म्हणजे बोडखा लिंब ठरलेला . हे कडू लिंबाचे झाड होते व त्याचेच नाव बोडखा लिंब होते , गंमत म्हणजे हे झाड खूप मोठे आणि डेरेदार होते जवळ जवळ १०० माणसे त्याच्या सावलीला बसू शकतील एवढी मोठी सावली असायची . मला कायम आश्चर्य वाटायचे कि एवढे मोठे झाड आणि त्याचे नाव मात्र बोडखा लिंब किती विरोधाभास ?
         जिज्ञासा थांबत नव्हती म्हणून एक दिवस आमचे एक चुलते त्यावेळी त्यांचे वय ४०च्या आसपास असावे , त्यांना मी विचारले " तात्या ! आपल्या गावाबाहेरचा रस्त्यावरील जो बोडखा लिंब आहे  तो एव्हढा भव्य आहे आणि त्याचे नाव मात्र बोडखा लिंब हे बरे नाही वाटत , हे असे नाव त्याला का पडले असावे ? " त्यांनी मला सांगायला सुरुवात केली ते म्हणाले ," अशोक ! अरे आम्ही लहान होतो तेव्हाची गोष्ट आहे हा जो बोडखा लिंब आहे ना तो तेव्हा फार मोठा डेरेदार वृक्ष होता . काही दुष्ट लोकांची वक्र दृष्टी त्याचेवर पडली आणि ते झाड त्यांनी तोडले , कोणी काही म्हणाले नाही कारण तेव्हा एव्हडी पर्यावरणाविषयी  एव्हढी जागृती नव्हती . त्यामुळे कोणीही झाड तोडणार्यांना काहीही बोलले नाही .झाड तोडले खरे पण ते सगळे तोडले नव्हते वर वर तोडले होते जमिनीपासून साधारण ३-४ फुट तसेच राहिले होते ." म्हणून या तुटलेल्या झाडाला "बोडखा " म्हणण्याची पद्धत पडली . आणि त्या सुंदर झाडाच्या त्या तुकड्याला "बोडखा लिंब " म्हणू लागले .

              कालांतराने ते तुटलेले झाड पुन्हा हिरवे होऊ लागले आणि हळू हळू त्याला पाने फांद्या फुटू लागल्या व काही वर्ष्यातच तो तुटलेला बोडखा लिंब हिरवागार होऊन परत डेरेदार वृक्ष झाला . पण ! त्याचे नाव मात्र "बोडखा लिंब " असेच राहिले .आणि आत्ताही तो आमचा थांबा बोडखा लिंब " हाच राहिला .आम्हाला जसे कळू लागले तसे आमच्या जन्मागोदर जन्मलेल्या बोडख्या लिंबाखाली किती लोक आले आणि किती गेले याची गणती नाही 
                  या  लिंबाचा बहुविध उपयोग होत होता . मला आठवते या झाडाखाली आम्ही शाळकरी मुले जाताना थांबायचो आणि शाळेतून येताना थकून भागून याच झाडाखाली विसावा घ्यायचो . तेथेच झाद्खाली एक सायकलवाला सायकली दुरुस्त करायचा . त्यावेळी मोटारसायकल क्वचितच दिसायची ..जवळ जवळ नाहीच म्हटले तरी वावगे ठरणार नाही . सायकल पंचार काढून देणे , तिला आईल -पाणी करणे हा त्याचा व्यवसाय त्याच्यावर त्याचे पोट भरायचे .म्हणजे बोडखा लिंब त्या कुटुंबाचा आधार होता . असाच एक टाकली मियाचा ज्योतिषी वेनुनाथ शिंदे  , तो वारकरी होता पण भविष्य सांगायचं व पत्रिका सुद्धा करायचा . त्याचा स्वभाव मोठा गोड , लाघवी सर्वाना त्याचे भविष्य आवडायचे .बऱ्याच वर्षे तो याच बोडख्या लिंबाखाली बसून भविष्य कथन करायचा . त्यालाही लोक दक्षिणा द्याचे त्याचेही पोट याच झाडाखाली भरले. कालांतराने तो जोतीशी मला तिथे दिसेना ,अधिक चोकशी केली तेव्हा  कळले कि तो जोतीशी या जगात आत्ता राहिला नाही .बोडख्या लिंबाने त्यालाही आधार दिला . </span>
<span>               गमत  म्हणजे त्यावेळी दारू पिणे म्हणजे फार मोठे समजत(खोटी प्रतिष्ठा ) असेच काही पेताड खूपच प्यायले कि याच लिंबाखाली येऊन पडत व शुद्धीवर आले म्हणजे पुढचा मार्ग आक्रमित असत .कधी कधी नगरचे प्रेमी युगल याच झाडाखाली कुजबुज करायचे त्यावेळी हे असे प्रकार अप्रूप वाटायचे येणारे जाणारे चोरून त्यांच्याकडे पहायचे आणि आपसात संस्काराविषयी चर्चा करायचे व हल्ली पिढी कसी बरबाद होत चालली याची चिंता करायचे (खरे तर मनातून त्यानाही मजाच वाटायची ) कधी कधी त्यांना हानामारही व्हायची तीही याच लिंबाखाली .
            नवरात्रीचा  उत्सव आमचे गावाला फार मोठा ..त्या नऊ दिवसात हजारो लोक यायचे तेही थकले कि याच झाडाखाली विसावा घ्यायचे .तिथे झाडाखाली पान-फुले विकण्याकरिता एक छोटी मुलगी वासायाची लोकांना दोन पैश्यात पान-फुले विकत द्यायची नऊ दिवसात तिलाही याच झाडाच्या आश्रयाला पैसे मिळायचे . कधी कधी पायी  जाणारे साधू-संत  जाता जाता याच जाडाखाली थांबायचे . घोटभर पाणी पिऊन पुढे चालू लागायचे . रात्रीच्या वेळी तर चोरांचेही आश्रयस्थान म्हणजे हेच झाड होय रात्री याच्या सावलीत कोण बसले आहे ते दिसत नसायचे व अचानक येणाऱ्या  एकट्या दुकट्या माणसावर हल्ला करून त्याला लुटायचे तेही याच झाडाखाली .
            अशा  अनेक घटनांचा साक्षीदार म्हणजे हा बोडखा लिंब .. पण म्हणतात ना "कालाय तस्मै नमः |" काळ जसा पुढे गेला तसे परिस्थिती बदलली कार आल्या , मोटारसायकली आल्या रस्ता गजबजू लागला नगरला जायला पूर्वी अर्धा तास लागायचं ठीथे आत्ता १० मिनिटात पोहचता येते त्यामुळे बोडख्या लिंबाखाली थांबायची कोणाला आवश्यकता वाटत नाही ,भविष्य कॉम्पुटरवर निघते त्यामुळे झाडाखाली बसून भविष्य सांगणारा झाडाखाली बसत नाही .या झाडाची आवशकता आता कोणाला वाटत नाही .
          एक दिवस एक बाई हातात कुर्हाड घेऊन या झाडावर त्याच्या बुंध्यावर घाव घालीत होती , त्याचे असे झाले कि एक बाजूने या झाडाची साल सुकली होती ती साल या बाईने काढली आणि  तिने घरी चुलीवर ती साल जलन म्हणून वापरली आणि स्वयंपाक करून घरातील सर्वाना जेऊ घातले. हळू हळू अनेक श्त्रीयानी झाडाची सर्व बाजूने साल काढली त्याचा परिणाम असा झाला कि ते झाड जवळ जवळ अर्धे वळून गेले , तरीही उरलेल्या अर्ध्या हिरव्या झाडाने  सावली देण्याचे सोडले नाही. काहीही तक्रार न करता सावली देताच राहिले.काही लोकही त्या अर्ध्या सावलीत बसून आराम करीत होते .कालांतराने ते  अर्धे झाडही सुकले. पूर्ण सुकलेले झाड लोकांनी पूर्ण तोडून नेले व स्वयंपाकाला वापरले. शेवट-पर्यत त्याचा उपयोग लोकांनी करून घेतला   " लावणी ज्याने केली | का खांडावया घाव घाली | दोघा एकची दे सावली | वृक्ष जैसा || हे ज्ञानेश्वरांनी सांगितल्या प्रमाणे हा स्थितप्रज्ञ वृक्ष शेवट-पर्यंत सावली देताच राहिला हा त्याचा स्वधर्म त्याने पालन केला , कोणाकडूनही प्रतीउपाकाराची भावना न ठेवता . एका परोपकारी जीवनाची इतिकर्तव्यता संपली . एक परोपकारी संपन्न जीवन संपले ...याची ना कोणाला खंत ना कोणाला पश्चाताप .

-अशोकानंद महाराज कर्डिले