सोमवार, २० जून, २०११

अहं ब्राम्हस्मी हा मंत्र नसून तो विचार आहे

जय हरी !
अहं ब्राम्हस्मी हा मंत्र नसून तो विचार आहे (मननात त्रायते इति मंत्र:- मननात तारतो तो मंत्र )  " देहोहम " म्हणजे मी देह हा जो भाव आहे तो घालविण्यासाठी मी ब्रह्म हा भाव किंवा विचार घ्यायचा नंतर तो पण टाकून द्यायचा आणि " सोहम तेही अस्तावले |" म्हणजे काहीच नाही अहं आणि सोहम दोन्हीही सापेक्ष आहेत पण त्यांचा उपयोग मी देह हा अहंकार घालविण्यासाठी होतो , साधी गोष्ट आहे मी आहे तर तू आहे मीच नाही तर तू कुठून ? ब्रह्म एक आहे हे म्हणणे सुद्धा सापेक्ष आहे कारण एकाच्या सापेक्ष दोन आहे " एरवी सर्वांच्या हृद्य देशी | मी अमुक आहे ऐशी | जे बुद्धी स्फुरे अहर्निशी | ते वस्तू गा मी || ज्ञानेश्वरी . किंवा जगद्गुरू श्री तुकारम महाराज म्हणतात ,' तुका म्हणे अहं ब्रह्म | आड येऊ नेदी भ्रम || " अहं ब्रह्म म्हणजे सुद्धा भ्रमच आहे .  वेदांताचा नियम असा आहे कि " समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो " एक भ्रम घालवण्यासाठी दुसरा भ्रम घ्यावा लागतो नन्तर तोही टाकून द्यावा लागतो .काट्याने काटा काढला कि दुसरा काटा फेकून द्यावा लागतो नाहीतर पहिल्यापेक्षा दुसरा जास्त घातक . लोखंडाची बेडी काय आणि सोन्याची बेडी काय दोन्हीही अडकवाणारच ..तेव्हा   तुका म्हणे अहं ब्रह्म | आड येऊ नेदी भ्रम || हेच खरे पण निरपेक्ष वृत्ती होण्यासाठी अंत:करणाची तेव्हढी तयारी लागते आणि हे " अभ्यासाने साध्य होते " श्री तुकाराम महाराजांचा एक फार छान अभंग आहे - साधुनी बचनाग खाती तोळा तोळा | अनिकाते डोळा न पाहावे ||१|| साधुनी भुजंग धरतील हाती |अनिके कापती देखोनिया ||२|| असाध्य ते साध्य करिता सायास | कारण अभ्यास तुका म्हणे || तेव्हा अहं-सोहमच्या पलीकडे जाण्याचा अभ्यास म्हणजे खरा परमार्थ होय.( practice  makes  man  perefect )